रुबेला म्हणजे काय?

रुबेला म्हणजे काय?
रुबेला हा एक विषाणूजन्य रोग आहे. रुबेला या शब्दाचा अर्थ आहे किंचीत लाल.ह्या रोगात अंगावर लालसर ठिपके दिसू लागतात, ह्याला जर्मन मिझल्स असेही म्हणतात व काही जण सौम्य कांजिण्याही समजतात.
भारतात रुबेलाची लागण आहे का ?
नक्कीच. वस्तूस्थिती अशी आहे की रुबेला हा रोग 1841 साली एका ब्रीटीश डॉक्टरला दिसून आला.परंतू रुबेलाची बाधा झालेल्या ब-याच लोकांना आपणाला हा रोग झाला याची जाणीवही नसते.
रुबेला कोणाला होतो? तो बालपणीचा रोग आहे का?
रुबेला हा फक्त बालपणीचा रोग नाही. तो लहान मुले, तरूण किंवा वृद्ध, स्त्री किंवा पुरुष कोणालाही होतो. ब-याचदा ह्या रोगाची लागण लहान मुलांकडून प्रौढांना होते.
रुबेलाचा प्रसार कसा होतो?
रुबेलाचा प्रसार एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीला हवेद्वारे बाधा होते, अर्थातच त्याचा प्रसार सर्वत्र सहज होउ शकतो. रुबेलाची लागण जेथे गर्दी जमते अशा कोठेही म्हणजे शाळांतून आणि शिबीरातून मोठ्या प्रमाणावर होउ शकते.
एखाद्याला रुबेला झालाय हे कसं ओळखायचे?
रुबेला झालेल्या व्यक्तीला सामान्यत: सौम्य ताप येतो. (39 से. किंवा 102 फॅ.हा. पेक्षा कमी). चेह-यावर व मानेवर लालसर ठिपके किंवा पुरळ दिसू लागतो आणि मागाहून शरीराच्या इतर भागावरही दीसू लागतो. चार पाच दिवसात तो मावळतोही. रुग्णाला थकल्यासारखं वाटतं. बरेच रूग्ण त्यांच्या रुबेला झालेल्याचे निदान होण्याआधीच बरेही होउन जातात. रुग्णाला इतर काहीही तक्रारी उद्भवत नाहीत! तरी देखील डॉक्टरना या रोगाची बरीच काळजी वाटते.
रुबेलाची अशी काळजी वाटण्याचे कारण काय?
रुबेलाची बाधा एखाद्या गरोदर महीलेला झाली तर मातेच्या नव्हे कर तीच्या पोटात वाढत असलेल्या गर्भाच्या दृष्टीने ती मोठी गंभीर बाब आहे. गरोदरपणात रुबेलाचे विषाणू गर्भापर्यंत पोहोचतात आणि गर्भावस्थेतील त्या जीवाच्या वाढीच्या व विकासाच्या क्रियेत अडथळा निर्माण करतात. गरोदरपणाच्या टप्प्यानुसार कधी कधी गर्भपातही होउ शकतो. परंतू त्याहूनही वाईट परीस्थिती असते रोगाला तोंड देऊन जीवंत रहाणा-या गर्भाची. ते बाळ जन्मभर पांगळे अपंग होउ शकते व त्याला जन्मभर अनेक अडचणी सोसाव्या लागू शकतात.
कोणत्या प्रकारच्या अडचणी व अपंगत्व ?
अंधत्, बहीरेपणा, मानसिक विकास न होणे, हृदयाचे आणि यकृताचे विकार व दोष इ. असे हे अपंगत्व सर्वांनाच येते असे नसून गरोदरपणाच्या कोणत्या अवस्थेत मातेला रूबेलाची बाधा झाली होती त्यावर अवलंबून असते, कारण गर्भाचे विविध अवयव मातेच्या उदरात गरोदरपणाच्या निरनिराळ्या अवस्थांत होत असतात.ह्या रोगग्रस्तांपैकी 50% मुलांना बही-यांच्या शाळेत तर 25% मुलांना श्रवणविषयक तक्रारींमुळे खास विद्यालयात जाण्याची वेळ येते.
रुबेलाची लक्षणे कोणती?
सुरवातीला कसल्याही प्रकारचा बेताचा ताप . अशा प्रत्येक तापाची नीट तपासणी करण्यात यावी. दुसरे लक्षण म्हणजे दुसरे लक्षण म्हणजे विशेषत: चेह-यावर आणि मानेवर लालसर रंगाचा सौम्य पुरळ. हा पूरळ खाली उतरत सर्व अंगावरही पसरू शकतो. गरम पाण्याने स्नान केल्यावर हा पुरळ विशेष लक्षात येतो.
गरोदर पणात अशी लक्षणे दिसू लागली तर काय करावे?
तुमच्या डॉक्टरांना ह्या लक्षणांची ताबडतोब माहिती द्या.तथापी ब-याचदा अनुभवी माणसांनाही ही लक्षणे समजू शकत नाहीत कारण 85% पर्यंत रूग्णांमधे असा पूरळ उठतच नाही.
डॉक्टरांकडे तुम्ही गेलात तर की रक्ताच्या काही तपासण्या करून रोगाची खरोखरच बाधा झाली आहे का ते नक्की सांगता येते. या तपासण्यातून आपण रुबेलाच्या संपर्कात आला आहात काय आणि असल्यास संसर्ग होउन किती दिवस झाले आहेत तेही कळून येईल. आणि त्यावरून गर्भाला रोगाची बाधा झाली आहे की नाही तेही सूचीत होउ शकेल.
काय केल्याने गर्भाचे संरक्षण होईल?
गर्भधारणेपूर्वी उत्पन्न झालेली व मातेच्या शरीरात अभिसरण होणारी प्रतिपिंड(Antibodies) रुबेलाच्या विषाणूंचा समाचार घेतात आणि त्यामुळे गर्भाचे रोगापासून संरक्षण होते.
ही प्रतिपिंडे कशी उत्पन्न करायची?
रुबेलाची बाधा झाली की मानवी शरीरात रुबेलाच्या विषाणूंना तोंड देणारी प्रतिपिंडे उत्पन्न होतात आणि अशा व्यक्तीला पुन्हा या रोगाची बाधा झाली तर आधी तयार झालेली व रक्ताभिसरणाबरोबर शरीरात फिरणारी प्रतिपिंडे नविन हल्ल्यास प्रतिकार करतात.
सुदैवाची व दुर्दैवाची गोष्ट अशी की रोगाच्या प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की भावी मातांना हा रोग आधी होउन गेलेला असतो आणि त्या लागणीमुळे त्याच्या अंगात रुबेलाला तोंड देणारी प्रतिपिंडे आधीच रक्तात उपलब्ध असतात. तथापी म्हणून निसर्गावर हा रोग सोडून देणे व भावी बालकांमधे होणारे संभाव्या धोके टाळण्याचा उपाय किंवा मार्ग होउ शकत नाही.

रुबेलाची लस टोचणे हा त्यावरचा प्रभावी उपाय आहे. मातेच्या अंगात त्या रोगाला तोंड देउ शकणारी प्रतिपिंडे तयार करुन घेउन गरोदरपणात गर्भाला होण-या संभाव्या धोक्यांपासून वाचवायची संधी आपणाला लसिकरणामुळे मिळते. महाराष्ट्र शासनाने 9 महीने ते 15 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना लसिकरण करण्याची मोहीम चालू केली आहे. आपणही आपल्या बालकांना ही लस टोचून घ्यावी व इतरांचेही लस घेण्यासाठी प्रबोधन करावे.

–डॉ. राजेश नवांगुळ
स्त्रीरोग तज्ञ
यशराज हॉस्पिटल सावंतवाडी.

Did you like this article??