आज आपणा सगळ्यांना सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज नरेंद्र डोंगर भ्रमंतीचे 11 वर्षं पूर्ण झाली , काही अपवाद वगळता ही गोष्ट अव्याहत पणे करू शकलो याचे परमेश्वराकडे आभार…..
ऊन ,वारा, पाऊस याना साक्षीला घेऊन , डोंगरावर जेंव्हा जेंव्हा पहाटे पाऊल ठेवले , तेंव्हा तेंव्हा एक वेगळा उत्साह संचारतो , खरेच “व्यायामाची पाउले चालली नरेंद्र डोंगराच्या पंढरीची वाट”, असे म्हणल्यास वावगे नाही…..
बरे वाईट प्रसंगाचा या काळात नरेंद्र माझा साक्षीदार होता, मग तो गांधील माशांचा हल्ला असुदे की झाड पडलेले असुदे की गव्यांचा कळप समोरून जाऊ दे,नरेंद्रवर चढाई करताना मला भीती अशी कधी वाटली नाही आणि भविष्यात अशी शक्यताही नाही…….
थंडीत धुक्याची चादर पांघरून उब देणारा नरेंद्र असेल, की पावसात खळाळून पाझरणारा ,हसणारा नरेंद्र असेल, उन्हात झाडांची सावलीची माया ,घाम काढल्यावरच देणारा नरेंद्र म्हणजे अफलातूनच….
आम्हा वाडीकर ना एक दैवी देणगीच नरेंद्रच्या रूपाने दिलेली असताना तिचा उपयोग बरेच जण करत नाहीत ही खंत मात्र मनाला बोचत राहते हे नक्की……
R सरांना जशी रांगणा ची नशा तशी माझी ही नरेंद्राची नशा बहुदा आमच्याबरोबर संपणार हे नक्की…..
तो सकाळचा पक्ष्यांचा किलबिलाट,कोकिळेचे कुहुकुहू, माकडांची लगबग, सावंतवाडीचा प्रसिद्ध हॉर्नबिल, मोठ्या झुपकेदार शेपटाचा शेकरू , 500 प्रजातीचे पक्षी, सारे काही नयनरम्य आणि अद्भुत,…..
परमेश्वराने आणखी पंचवीस वर्षे नरेंद्र चढण्याची ताकत द्यावी हीच प्रार्थना…..
Great ??