दंत आरोग्य – डॉ. अभिजित वझे, सावंतवाडी.

दंत आरोग्य

यात मूलतः ‘संपूर्ण आरोग्य असच शीर्षक शोभले असते , पण ’दंत’ हा शब्द खास यासाठी, की काही ‘दंत-कथा’ पुसल्या जाव्यात , काही अगदी लहान, पण तितक्याच अगदी महत्वाच्या सूचना वाचाकांपर्यंत पोचाव्या, हा प्रयत्न .

‘दातांच्या उपचाराचे झेंगट नको रे बाबा’’.‘किती त्या appointments , किती तो खर्च!’

‘तो dental chair  चा लाईट सुरु झाला कि धडधडायला लागते’

‘सगळे परवडले पण दाताची दुखणी नको रे भगवंता!’

…..अशी अनेक वाक्य आपल्या कानावर पडत असतात.

मुख-आरोग्य टिकवून ठेवले तर ही dental treatmentची कटकट कायमची ‘कट’ होऊ शकते हे नक्की.

या संदर्भात काही उपाय, थोडी काळजी (रोज घेण्याची), एवढे केले , की मग हवे तेवढे हसा!

(उगीच दात दाखवून हसू नका, समोरचा चिडेल, …पण दात सुंदर दिसतील!)

अगदी जन्मापासून सुरु करूया. नवजात शिशूला दात सहसा नसतात.वयाच्या ६ ते ९ महिन्यामध्ये दुधाचे दात यायला सुरुवात होते.काही मुलांना अगदी जन्मताच एक किवा दोन दात आलेले दिसतात, अशा दाताना natal teeth असं म्हणतात.

काही मुलांना जन्मल्यापासून १ महिन्याचे होईपर्यंत दात येऊ शकतात…अशा दाताना neonatal teeth असं  म्हणतात.अशी मुलं जन्मताच dental patients  होऊ शकतात.सहसा, natal teeth हलत असतात. अशा वेळी ते गळून श्वास नलिकेत अडकण्याची  भीती असते.(aspiration). अशा परिस्थितीत ते दात त्वरित काढून घेणं गरजेचे असते.

नेहमीचे दुधाचे दात येताना ताप येणे, अतिसार होणे, झटके येणे, प्रसंगी मृत्यू होणे, अशा  बऱ्याच  ‘दंत-कथा’ सांगितल्या जातात. पण वास्तवात दात येणे , ही शारीरिक विकासाची सामान्य प्रक्रिया आहे. Physiological आहे.

दात येताना, बाळाच्या हिरड्यांना सळसळ होते, खाज येते, अस्वस्थता असते. त्यामुळे बाळ चावा घ्यायचा प्रयत्न करते.लाळ गळत असते, त्यामुळे त्वचेला पुरळ येऊ शकते,बाळ अस्वच्छ वस्तूंना चावायचा प्रयत्न करते, त्यामुळे संसर्ग होऊन जुलाब होऊ शकतो, ताप येऊ शकतो. अशा वेळी अस्वच्छ वस्तू जवळ नसाव्यात. मूल दोन अडीच वर्षाचे असल्यास, दात येताना चावू पाहत असल्यास, त्यासाठीची रबर ची वेगळी खेळणी वापरू शकतो, फ्रीज मध्ये ही खेळणी ठेवून, ती थंड करून बाळाला चावण्यासाठी जवळ दिल्यास, बाळाला होणारी हिरड्यांची खाज कमी होण्यास मदत होते….खेळणी स्वच्छ वापरल्याने, इतरत्र संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होते.

दात येताना आहार चांगला मिळणे गरजेचे असते. Calcium  युक्त natural पदार्थ, fats, विटामिन A…हिरव्या पालेभाज्या ,पिवळी, केशरी रंगाची फळे, यांचा समावेश केला पाहिजे.मुलांना सहज तुटणारी, छोटे  भाग असणारी खेळणी या वयात देऊ नयेत. चावा घेतल्यास, छोटे तुकडे होऊन ते aspirate  होण्याची शक्यता असते.या वेळी, संसर्गाने ताप आला तर  बालरोगतज्ञांच्या सल्ल्याने paracetamol देऊ शकतो, किवा वेदनाशामक gel हिरड्यांना लावता येते.

मुलांचे दात येतानाच्या वयात पालकांसाठी काही सूचना:

१)६ महिने ते १ वर्ष वयात, दूध पाजाव्ल्यानंतर स्वच्च्छ GAUZE ने दात पुसून घेणे.

२)बाळ झोपल्यानंतर बाटलीने दूध, वा फळांचा रस पाजवू नये.

३)बाळ २ वर्षांचा झाल्यानंतर बेबी ब्रश ने रोज दोन वेळा दात घासावे. सगळ्या दातांवरून, हिर्द्यांवरून ब्रश फिरला जाईल, याची काळजी घ्यावी.

४)ब्रश  बरोबर XYLITOL युक्त पेस्ट वापरल्यास किडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते..

लक्षात असुद्या….दात स्वच्छ ठेवणे ….हे तितकेच महत्वाचे आहे जितके रोज अंघोळ करणे, लसीकरण करणे,स्वच्छ कपडे घालणे इ. आहे.

6 YEAR MOLARS….एक महत्वाचा टप्पा.

६ वर्ष ….पहिल्या PERMANENT दाढायेण्याचंवय.(TOTAL 4 PERMANENT FIRST MOLARS…TWO IN MAXILLARY ARCH,,TWO IN MANDIBLE ARCH).या वयात मुलंस्वतः दात घासू शकतात, पण बर्याचदा ब्रश वरचेवर फिरवला जातो आणि आहारात CHOCOLATES, इतर गोड पदार्थ भरपूर प्रमाणात असतात, नेमके याच वेळात जर ब्रश व्यवस्थित सगळ्या दातांवरून फिरला नाही तर, हे 6YEAR MOLARS लगेच किडून जातात.इतक्या लवकर किडतात की दात दुख्ल्यानंतरच पालक जागे होतात, तो पर्यंत कुणाचे लक्ष जात नाही.हे टाळण्यासाठी प्रत्येक मुलावर लक्ष ठेऊन, ब्रशिंग कसे करायचे याचे मार्दर्शन DENTISTकडून घेणे आवश्यक आहे.

USE OF DENTAL SEALANTS:

दातांच्या ANATOMY नुसार, त्यांवर काही उंच भाग, (CUSPS) अंड काही खाचा,(FISSURES) असतात.या मध्ये अन्नाचे कण  अडकल्यास, तिथे किडण्याची प्रक्रिया लगेच सुरु होऊ शकते. हे रोखण्यासाठी, डेंटल SEALANTS नावाचे मटेरीअल, FISSURES मध्ये भारता येऊ शकते, जेणेकरून, अन्न अडकण्याचा जागा शिल्लक राहत नाहीत, आणि किडण्याची प्रक्रिया थांबू शकते.

FLUORIDATION:

अभ्यासानुसार, WATER FLUORIDATION, हा एक उत्तम प्रकार आहे, कि ज्या मुळे दात किडण्याचे प्रमाण  खाली येऊ शकते.

याचा उपयोग,सगळ्या वयोगटांना होतो,हे महाग नाही, लोकांना फक्त FLUORIDATED  पाणी पिणे, या व्यतिरिक्त अजून काही करावा लागत नाही..(OPTIMAL RANGE OF FLUORIDATION…IS 0.7 PPM TO 1.2PPM)

FLUORIDATION, हा विषय , मोठा असल्याने, त्यावर, पुढील लेखात विस्ताराने जाणून घेऊच.

 

हुश्य ….थोडे मोठयांच्या दातांकडे वळूया.

(या लेखात, फक्त दात किडू नयेत, म्हणून घ्यावायाची काळजी, याबद्दल लिहितोय, अनेक इतर विषय हाताळायचे आहेत, पण लेखाची लांबी बघता, वाचक दात ओठ खाऊन  वाचतील, याची भीती असल्याने हे बंधन घालून घेतलय.पुढच्या ल्केखात FLUORIDATION हा विषय घेऊया  , आणि इतर विषय त्या पुढे.)सगळ्यात महत्वाचे म्हणजे दात का किडतात हे बघूया म्हणजे ते किडू नयेत यासाठी काय करता येते हे लगेच कळेलच.

आपल्या तोंडात असंख्य वेगवेगळे बाक्टेरिया असतात. आपण खाल्लेल्या पदार्थांमधल्या सुगर्स वर हे BACTERIA जगतात, व या प्रक्रियेत ACIDS तयार करतात. हे ACIDS एनामेल ला DEMINERALIZE करून, त्यावर छिद्र पाडू शकतात..अर्थात दात किडायला सुरुवात!

अन्नकण , SALIVAमिश्रित PLAQUE दातांवर साठतो, आणि प्लाक साफ न केल्यास, त्यातील BACTERIA   अजून ACIDS तयार करतात , ज्यामुळे DEMINERALIZATION ची प्रक्रिया चालू राहते.

थोडक्यात, अन्नाचे कण जास्त वेळ दातावर प्लाकच्या रुपोत राहिले, तर दात किडतात!

एनामेल खराब झाल्यावर DENTIN धोक्यात येते, आणि मग दाताच्या आतला गाभा, म्हणजेच, PULP पर्यंत ही प्रक्रिया पोचते…..परिणाम, दात दुखी…PERIAPICAL INFECTION, ( MAY LEAD TO CHRONIC OSTEOMYELITIS, IF LEFT UNTREATED)

दात किडण्याचा  धोखा खालील  बाबतीत जास्त असतो:

१)धुम्रपान

२)DIABETES

३)गोड पदार्थ , बेकरी प्रोडक्ट्स, जंक फूड जास्त प्रमाणात खाणे.

४)ब्रश चा वापर न करणे

५) DRY MOUTH.

दात किडू नयेत म्हणून, हे करा:

१)         खाल्ल्यानंतर, खळखळून चुळा भरणे.

२)         दात घासणे, जीभ घासणे….किमान दोन वेळा .

३)         FLUORIDATED TOOTHPASTE वापरणे,( काही अपवाद वगळता सगळ्यांनी)

४)         दात कसे घासावे, याचे प्रात्यक्षिक DENTIST कडून घेणे.

५)         डेंटल [i]SEALANTS चा वापर करून FISSURES भरून घेणे.

६)         दर सहा महिन्यांनी डॉक्टर कडे दात दाखवणे.

७)         गोड, चिकट , जंक पदार्थ, CARBONATED DRINKS, जास्त प्रमाणात TEA COFFEE टाळणे.

८)         दात दुखी, हिरड्याचे दुखणे , यांवर दुर्लक्ष न करता लगेच उपचार करून घेणे.

९)         स्वतः रोज दातांकडे लक्ष देणे, कुठल्याही प्रकारचा फरक दिसल्यास, दान्त्वैद्यांकडून त्याची खात्री करून घेणे.

थोडक्यात, खाण्याचे आणि दाखवण्याचे दात सारखेच असावेत , आणि तसं ठेवणे हे आपल्याच हातात आहे.

PREVENTION IS ALWAYS BETTER THAN CURE

BETTER BE SAFE, THAN SORRY!!!!!

 

………………….

डॉ. अभिजित वझे, दंतवैद्य , सावंतवाडी

17/12/2017

 

 

 

[i]

This Post Has One Comment

  1. somnath parab

    good

Did you like this article??