होमिओपॅथी ही उपचार पध्दती १७९० मध्ये जर्मन डॉ. हानेमान यांनी शोधून काढली. आज जगात अनेक देशांमध्ये अलोपथीला पर्याय म्हणून ती वापरली जाते. Similia Similibus Curentur अर्थात काट्याने काटा काढणे या तत्वावर ती आधारलेली आहे.
ही उपचार पद्धती पूर्णपणे विज्ञानावर आधारित असून विज्ञानाच्या इतर शाखा जसे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र इत्यादींच्या नियमांशी नाते सांगते. यातील औषधे सामान्यतः वनस्पती व खनिजे यांपासून बनतात. काही औषधे प्राण्यापासून देखील बनवली जातात पण त्याचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. ही औषधे अल्कोहोल बेसमध्ये तयार केली जातात. त्यामुळे सगळ्या औषधांचा रंग व चव सारखीच वाटते.पण तसे नाही. आज सुमारे ३००० होमिओपथिक औषधे सिद्ध करण्यात आली आहेत. विविध आजारांवर ती उपयोगी असल्याचे सिद्ध झालेलं आहे.
होमिओपथिक औषधांनी गुण उशिरा येतो हा एक गैरसमज आहे. वेळ लागतो हे खरे आहे पण पेशंट आजार झाल्यावर लगेच डॉक्टरकडे गेला तर गुण लवकर येतो पण पेशंटच उशिरा आला तर तो पर्यंत आजाराने उग्र रूप धारण केलेले असते. मग असा पेशंट बरा व्हायला वेळ लागणारच.
या औषधांचा महत्वाचा गुणधर्म म्हणजे ती चवीला गोड लागतात त्यामुळे लहान मुले देखील ती आवडीने घेतात. ही औषधे अचूक निवड करून दिल्यास कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जर निवड चुकली तर मात्र काही त्रास होऊ शकतो. अश्यावेळी लगेच औषध बंद करून Antidote दिल्यास वाईट परिणाम दुरुस्त करता येतात. सर्व वयोगटातील व्यक्ती तसेच गरोदर स्त्रियांना देखील ही औषधे अधिक सुरक्षित आहेत.
या बद्दल अधिक माहितीसाठी किंवा शंका समाधानासाठी भेटा अथवा लिहा.
डॉ. श्रीराम हिर्लेकर, वेंगुर्ला. संपर्क- 9423300870